Skip to main content
काळाच्या ओघात लुप्त पावलेला महाराष्ट्रातील मिना समाज , स्वाभिमानी मिना समाज सेवकांन मुळे परत जोमाने सर्वत्र प्रसिद्धीच्या झोकात आला . - विलास सिंग सुलाने यांचे प्रतिपादन महाराष्ट्रातील मिना समाज लुप्त का पावला यांचे दोन कारण 1) इतिहासात डोकावून पाहिले असता अशे लक्षात येईल कि महाराष्ट्रातील मीना समाजाने इंग्रजांच्या विरोधात लढतांना सन 1857 च्या क्रांती युद्धात भाग घेतले त्या मुळे इंग्रजांनी या समाजाला जेरिस आणण्यासाठी यांच्या वर जरायम पेशा का गुन्हेगारी कायदा लागु केला. या कायद्याच्या जाचक अटितुन वाचण्यासाठी साठी त्या वेळच्या मिना लोकांनी आपली मिना जात लुपवून परदेशी सांगितले . 2) शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना आग्रा येथुन बादशहा औरंगजेबाच्या कैदेतुन सोडण्यात मीर्झा राजे जयसिंग च्या फौजेतील मिना सैनिकांनी मदत केली . या कारणांमुळे राजा जयसिंग च्या आणि बादशहा च्या दहशती मुळे औरंगाबाद शहरातील मीना सैनिक औरंगाबाद च्या आसपासच्या डोंगर डर्यात तसेच जालना बुलढाणा जळगाव अमरावती व वर्धा या जिल्ह्यात आपली मीना जात लपवून परदेशी नावाने जगु लागला . 3) मिर्झा राजे जयसिंग हे राजपूत होते ते बादशहा औरंगजेबाचे मंडलीक होते तसेच ते राजस्थान जयपुर येथील राजे होते . ते स्वराज्य वर स्वारी करण्यासाठी आले तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातील मिना सैनिकांना आपल्या राजपूत सैनिकांत सामिल केले त्या मुळे महाराष्ट्रातील मिना लोकांना पण इतर लोक राजपूत समजायला लागले . अशा प्रकारे देश हिता साठी प्राणपणाने लढणारा महाराष्ट्रातील शुरविर इमादार मेहनती मिना समाज काळाच्या ओघात लुप्त पावला होता . महाराष्ट्रातील स्वाभिमानी मिना समाज सेवकांनी सोशल मिडीया च्या माध्यमातून मिना समाजाला परत प्रसिद्धीच्या झोकात परत आनले. मिना समाजाला महाराष्ट्रात obc या कटेगीरि आरक्षन आहे. आपल्याला आपल्या मिना जातीच्या नावाने सन्मानाने जगता यावे या साठी अनेक मिना समाज बांधव शाळेच्या रेकार्ड मध्ये दुरूस्ती करुण परदेशी , राजपूत अशे शब्द हटवून मिना (Mina ) लीहत आहे. अशी माहिती महाराष्ट्रातील मिना समाज आरक्षनाचे शिल्पकार आणि मिना समाज संघटना महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष विलास सिंग सुलाने यांनी सांगितले . त्यांनी पुढे सांगितले कि आपली पुढील लढाई महाराष्ट्रातील मिना समाजाल ST कटेगीरित घेण्यासाठी अशेल. त्यासाठी महाराष्ट्रातील मिना समाजाला संघटीत होने हि काळाची गरज आहे.
Comments
Post a Comment